कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.

केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार

मन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.
.

कबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.

कबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात. कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, इस्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.

पण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते. अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, ११/१२/२००९.

3 प्रतिक्रया:

रविंद्र "रवी" ने कहा…

सचिन, तू कबीराचे दोहे समजून घेतोस याबद्दल मला तुझे कौतुक करावेसे वाटते. कबीरजी म्हणतायेत, अरे तू डोक्याचे काय मुंडण करतोयस, त्या मनाचे मुंडण कर ज्यात विष भरलेले आहे. वा वा!! वा सचिन तुझी आवड बघून मन प्रफुल्लीत झाले. तुला माहित आहे का कबीर हे जुलाहे ह्या समाजाचे होते. जुलाहे म्हणजे विणकर.

साळसूद पाचोळा ने कहा…

रविंद्र रवीजी....

आपल्या सारख्यांकडूनच माझ्या माहितीत भर पडत असेते. कबीर हे जुलाहे(विणकर) सनाजाचे होते हि नवीन माहिती मिळाली आपल्याकडून...

कबीर हे त्यांच्या पुर्वीजन्मी शुकमुनी होते. हे हि मला अगदी अलिकडेच कळले आहे..

धन्यवाद परत एकदा...

dattatraya Patwardhan ने कहा…

खूप छान, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
thanks.

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..