कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

.
मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय,
बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

हा "मुंडणावरिल" अजून एक दोहा आमचे एक मनोगती शरद कोर्डे यांनी अर्थासह सुचवला. मलाही तो खूपच आवडला.
मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्याने (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.
.
इथेही कबीर साधे, रोखठोक आणि सहज पटणारे उदाहरण देऊन प्रबोधन करताहेत की वैकुंठप्राप्ती साठी असल्या कर्म-कांडांची काडीमात्र गरज नाहीये. त्यात उगाच जीवन व्यर्थ घालवू नका.
.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, १6/१२/२००९.

1 प्रतिक्रया:

Unknown ने कहा…

पाचोळा, वृत्तीने शेतकरी असल्यामुळे, ही वस्तू मला मूल्यवान आहे. अर्थातच माझ्या लेखनाला पाचोळा खतपाणी देतो.
मी आपला माझ्या चित्र-लेखाची नोंद घेतल्याबद्दल आभारी तर आहेच, पण आपला ब्लॉग - जालनिशी-- पाहिल्यावर पटले हा केवळ योगायोग नाही. तुमच्या ब्लॉग वर कबीराची उपस्थिति पाहून आनंद झाला.
अनेक शुभेच्छा

-- रेमी

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..