काही शेतकरी नुकतेच(२ वर्षापूर्वी) मनमोहनसिंगांना भेटले.हात जोडून ते पंतप्रधानांना म्हणाले " मालक, आम्हाला नोकरी द्या, शेती नकोच,........ जगलो वाचलो तर शेती करता येईल". शेतकऱ्यांनी शेतीविषयी एक चक्कार शब्दही काढला नाही. हि उदाहरणे शेती कोमात चालल्याची नाहियेत तर काय आहे? त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? त्या शेतकऱ्यांच्या झोपडीत शिरून त्यांची चौकशी करावी असेही, ह्या मंत्र्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान विदर्भात आले तेव्हा त्यांच्या मागून हे विदर्भात आले....
सरदार वल्लभभाई पटेल मान्सून आला की प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री फोन करून विचारायचे, "पावूस व्यवस्थित आहे का? पेरणी झाली का? "... आणि विशेष म्हणजे ते गृहमंत्री होते, कृषीमंत्री नव्हेते... वल्लभभाईंची ती तळमळ कृषीमंत्र्यांमध्ये कधी दिसलीच नाही.
२५ वर्षापूर्वी देशातील ७०% शेतकरी असलेल्या जनतेचा देशाच्या जी.डी. पी. मध्ये वाटा होता ६०%...आणि आज देशातील ६५% जनता शेतीवर अवलंबून असताना देशाच्या जी.डी.पी. मध्ये शेतीच वाटा २५% पेक्षाही कमी आहे, हे मंत्र्यांची खात्यावर किती आणि कशी पकड आहे हेच तर दाखवतेय... काय परफॉरमंस आहे राव? ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात? कुठे आहे ते? विसरला वाटत? साहेब अजूनही महाराष्टातिल ५५% शेतकऱ्यांवर पर हेड सरासरी १६००० रु कर्ज आहे,.. महागडी औषधे, बी-बियांनी, खते, कीटकनाशके, मशागत खर्च मिळून सरासरी ११००० रु उत्पन्न खर्च, आणि उत्पन्न केवळ १५०००, कसं सुधारायचं आम्ही?
लवकरच तुम्ही पायउतार व्हाल, पण शेतकऱ्यांच्या मानगुटी वरील ह्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय? ....
ह्या इनिंगची पुरी मैच संपेपर्यंत आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी एकटक..... मात्र स्कोअर बोर्ड काही हललाच नाहि....
आता क्रिझ सोडण्यापुर्वी, जाता जाता एखांदा चोका-छक्का तरी मारा?
.
.
...सचिन, नारायनगाव, पुणे. 11 may 2009.
सातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)
4 वर्ष पहले
3 प्रतिक्रया:
हे निरललजमेले त्याना जनाची नाही आणि मनाची पण नाहीचा नाही
मी माज़ी मुलगी पुताण्यापाहिजे
महारास्त्रागेला तेल लावत
IPL मधून वेळ असेल त्यांना तर बघतील कदाचित ... :(
त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही .. पण पुन्हा कृषिमंत्री झाले तर ?? :O
Namaskar Sachin saheb
Saheb jenhva six/four martil tenhva martil ..
matra tumhi six+four = 10 ekdach marale ..
zabardast article ...
एक टिप्पणी भेजें
..मनापासुन ध्न्यवाद..