नवा शिवधर्म शक्य आहे का?

कुठल्याही धर्माच्या निर्मितीसाठी जे वैचारिक अधिष्ठान, भक्कम पाया असायला हवा तो इथे कुठेच नाही. इतर धर्मातून आयात केलेले विचार, एका धर्माच्या द्वेषापोटी दुसरा धर्म अस्या विचारांची रसमिसाळ करून धर्म स्थापला जाऊ शकतो पण तो रुजवला जाऊ शकत नाही.


धर्मनिर्मीती/स्थापना हि संकल्पनाच पुरातन आणि संक्रमणशील आहे, धर्मनिर्मितीची कल्पना जेव्हा हजारो वर्षापूर्वी धर्माच अस्तित्व नव्हतं तेव्हाच गरजेपोटी उत्पन्न झाली होती, तो काळ त्यास पूरक होता. आजचा काळ "धर्म निर्मिती" स पूरक तर नाहीच, शिवाय नवीन कुठलासा धर्म निर्माण केल्या शिवाय आपण जगूच शकणार नाही असे धर्माचे अवडंबर आज गरजेचेही नाही. धर्मविचार, धर्मसंस्कृति हळू हळू मागे पडत आहे, नावापुरता फक्त धर्माभिमान तेवढा शिल्लक आहे.

धर्म स्थापणे हि पुरातन आणि अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणूनच हि मंडळी "शिवधर्म स्थापणा" न म्हणता मुद्दामहून "शिवधर्म प्रकटणं" असे संबोधतात, म्हंजे हाही धर्म पुरातनच आहे, तो फक्त पुन्हा प्रकट होतो आहे असा भ्रम देऊ पाहत आहेत. कारण पुरातन असल्याशिवाय धर्मांबद्दल ओढ, आपुलकी निर्माण होणे सहज शक्य नाही.

धर्मांतर, धर्मनिर्मीती किंवा तत्सम प्रकटीकरणात जितकी ऊर्जा वाया जाईल ति ऊर्जा आहे ति धर्म सुधारण्यात खर्ची घातली तर उपयुक्त ठरले. पण तसे केले जात नाही करणं त्या मागे काही "धार्मिक आणि राजकीय गणिते" नक्की जुळविलेली आहेत.

शिवधर्माने मांडलेल्या तत्त्वांचा लेखाजोखा करायचा म्हटला तरी त्यात कैक न पटणारे विचार आढळतात. शिवधर्माचे जे स्वताचे पुरोगामी विचार आहेत ते या जागतिक उदारीकरणाच्या या जगात ते पुरातनच वाटताहेत.

शिवधर्माची घोषणा होवून आठ वर्षे तरी नक्की झाली असतील, दरवर्षी लाखो लोक धर्मात येताहेत असे भासवले जात होते. आज किती जन या धर्माचे अनुयायी झाले आहेत हे कळेल काय?
साळसूद पाचोळा.

6 प्रतिक्रया:

बेनामी ने कहा…

सर्व धर्मांची निर्मिती सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास यासाठी झाली आहे.त्यात वेगळेपणा आहे असे वाटते ते प्रत्येक धर्माने केलेली सुखदुःखाची व्याख्या वेगळी आहे म्हणून. नवीन धर्म या कसोटीला उतरला तरच त्याला धर्म म्हणता येईल.

www.sumbran.blogspot.com ने कहा…

chhaan lihil aahe

बेनामी ने कहा…

लेखकाला वास्तविकतेचे भान नाही ! आज शिवधर्म कोण पाळतो ?? जवळपास प्रत्येक गावात शिवधर्म माहीत आहे. शिवधर्मी लोकांची संख्या मोठी आहे , पण गवर्नमेंट च्या कागदावर अजून शिवधर्मी आहे अशी लिहण्याची सोय नाही. 2014 ला शिवधर्माची संहिता तयार होईल. कोणत्या धर्माचा द्वेष किंवा जातीचा द्वेष म्हणून शिवधर्म स्थापन झाला हे म्हणणं चुकीच आहे, शिवधर्म हा म्हराष्ट्राचा खरा धर्म आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची चुकीची मीमांसा केली आहे.

prakash ने कहा…

शिवधर्म वाल्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या भावनांचा विचार केला आहे का? ज्या उद्देशाने त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याचे फलित काय शिवधर्मात आहे?

Gruhakhoj.com ने कहा…

I read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
सांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = visit gruhkhoj .

Gruhakhoj.com ने कहा…

Get free details of 3 BHK, 2 bhk flats in Aurangabad (Sambhajinagar) Maharashtra within your budget

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..