महामानवाची जयंती

काल महामानवाची जयंती झाली।।
.
तत्कालीन समाजाने लाथाडलेल्या पतितांना सामाजिक विषमते विरुद्ध अखेरपर्यंत लढत देत धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नती साठी आकाशपाताळ एक करणाऱ्या "जीवनाचा" हा जन्म दिन। आंबेडकरांच्या शब्दरुपी असलेल्या जीवनपटावर, विचारांवर, विद्वत्तेवर, व्यासंगावर, बुद्धिजिवीपनावर, त्याचबरोबर निर्दोष असूनही जन्मदोष देत मिळालेल्या विटंबनेवरून आठवणींचा प्रकाशझोत फिरवण्याचा हा दिवस.... पण प्रत्यक्षात संध्याकाळी नशेत तर्र होवून नाचणारी अनुयायी मंडळी पाहिली आणि हि "रिपब्लिकन चळवळ" नेमकी उलट दिशेने चालली आहे ह्याची खात्री झाली
.
सामान्य अनुयायांबद्दल चर्चा सध्या बाजूला ठेवूयात, पण त्यांचे नेते, पुढारी आणि बाबासाहेबांचे वंशज म्हणविणाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या फक्त नावाचा वापर करीत, बाबासाहेबांच्याच विचाराला, हेतूला स्वार्थ, अभिमान आणि मान-मर्यादे पोटी कधी नकळत तर कधी जाणुंबुजून बगल दिली। आरकक्षनाच्या कुबड्या घेतलेल्या ह्या धडधाकट समाजाला या नेत्यांनी खरेखुरे अपंग बनविले, गेल्या ५७-५८ वर्षात त्यांना घटनेतील आरक्षणाचा उपयोग त्यांच्या समाजा साठी करता आला नाही. किंबहुना समाज शिकला सवरला तर तो आपसूकच आपल्याला दूर ढकलून देईल हे कदाचित ते जाणत असावेत।
.
गरिबीवर मात करत, दिव्याखाली रात्रोंदिन अभ्यास करत बॅरिस्टर होणाऱ्या स्वतःच्या नेत्याचं उदाहरणही हा समाज विसरून गेला. असे असताना मग नुसती :जयंती साजरी करण्यात काय अर्थ राहतो?।
.
१९५७ ला स्थापन झालेला रिपब्लिकन १९५८ ला लगेच फुटला। रुपवते, खोब्रागडे, गायकवाड, गवई, आंबेडकर, आठवले, कवाडे, ढसाळ पासून ते मायावती पर्यंत कैक पक्ष, गट, तट पडले. मतांसाठी कांग्रेस, राष्टवादिनेही रिपब्लिकनांचा पुरेपूर वापर करून घेतला. एक खासदारकी मिळविण्यासाठी सारा पक्ष आणि विचार दोन्ही कांग्रेसच्या दावणीला बांधणारे आठवले, गवई पाहिले की हे बाबासाहेबांच्या विचारांचे रखवाले आहेत की वापरकर्ते आहेत हे शहाण्यास आपसूक समजते॥
.
दलितांचा एक रिपब्लिकन पक्ष असावा हे बाबासाहेबांच्या स्वप्न त्यांच्या जाण्यानंतर लगेचच त्यांच्याच अनुयायांनी तुकडे तुकडे करून टाकले...

0 प्रतिक्रया:

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..