खासदारकीच व्होंटिंग उद्या होणार होतं।
.
रात्रीचे १०।३० वाजले असतानाही, मी पुण्याहून आमच्या गर्भवती सौभाग्यवतीसह गावाला जायला निघालो, राजगुरुनगर मधून विकास लाही घेतला. शेवटी हक्काच्या ३ मतांचा प्रश्न होता.

रात्रीचे ११.०० वाजताहेत न वाजताहेत तोच मोबाईल खणानला,.. गावातून मोठ्या भावाचा फोन.
हालो..
आरं.. कुठं पर्यंत आलाय ?
राजगुरुनगर मध्ये आहे, का रे?
आरे तिकडे भोसरी आणि हडपसर मधी ती लोकं १५००-२००० रु मतांमागे वाटायला लागलेत असं म्हणत्यात? जरा चौकशी कर आन लग्गेच फोन मार आम्हाला?
मीही भोसरिच्या स्थानिक मित्रांना फोन मारले, बातमीला दुजोरा मिळाला, आन आमची चलबिचल चालू झाली।

रस्त्याने कैक ठिकाणी स्कारपिओ गाड्या आणि त्यांच्या आडोशाला चाललेल्या वाटाघाटी दिसल्या. रात्री १२.३० ला गावात पोहचलो, कार्यकर्ते कट्यावर मतफोडा-फोडी टाळण्यासाठी पहारा देतच होते. मांगवाडा, महारवाडा असल्या वस्त्यांकडे जरा बारकाईने ध्यान द्यावे लागते... नाहीतरी तसेही ते आमच्या बाजूने चालत नाहीतच.. जिकडून पैसा तिकडं उदो उदो हे त्यांचं ठरलेलं. आन आमच्या कडे त्याचा (पेश्यांच्या) सदैव वानवाच.
रात्री दोन सव्वा दोन पर्यंत जागून सकाळी गावात हजर... आम्हाला बूथ टाकण्यासाठी ४००० रु तर विरोधकांना त्यांच्या उमेदवाराकडून १०००० रु मिळालेले. पेश्यांसाठी काम करणारे आम्ही नव्हतोच. नेहमीप्रमाणे उत्फुर्त पणे कामाला लागणारी आमची टीम जमली होती.. स्कार्पिओ, बोलेरो, व्हैन, टु व्हिलर जमेल त्या गाडीवरून वस्त्या-वस्त्यांवरून मतदार गोळा करून बूथवर आणून सोडायचा धडाका चालू झाला... म्हाताऱ्यांना ४-४ वेळा कुठलं बटणं दाबायचं (आणि कुठलं चुकूनही दाबायचं नाही) हे काळजीनं प्रत्येक जणं सांगायचाच.... गायकवाड मळा, धनवाट, झोपडीमळा, खंडागले मळा, थोरात मळा, गावठाण, कधी कधी एका-एका मतासाठी दहा-वीस किलोमीटरची मजल मारायला लागायची तरीही मागे हटायचो नाही... त्यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्रात काही गडबड करतोय हे कळताच आम्ही सारे तिकडे धावलो.. जाम बाचाभाची झाली. वारंवार केंद्रात घुसून ढवळाढवळ करू पाहणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचो. मतदान केंद्रातील रांगेत मत फोडाफोडी होवू नये म्हणून दोन-तीन जन २०-२५ मिनिटांच्या अंतरानं मतदानाला जायचो... ४. ३० वाजता मी मतदान केले. ५ वाजेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे ६६ टक्के मतदान करून घ्यायला आम्ही यशस्वी झालो.. मतपेट्या शिलबंद झाल्या "भारत सरकार" च्या महिंद्रा मार्शल मधून पुण्याकडे पार्सल झाल्या... आणि आम्ही निकालापर्यंत (१६ मे)अगदी निर्धास्त झालो.. मुक्ताई च्या समोर छोटी खानी सभा घेऊन साऱ्यांचे आभार प्रदर्शन झाले... साऱ्यांना "झटून" काम केल्याची पावती मिळाली.... आपलाच उमेदवार येणार, अशी साऱ्यांनी अभिमानी अलिखित ग्वाही दिली...
.
सभा संपते ना संपते तोच हळूहळू "थकल्याची" जाणीव झाली.
सचिन, नारायनगाव, पुणे, २३/४/२००९.
फोटो सोजन्य - गुगल. ईमेजेस मधून

0 प्रतिक्रया:
एक टिप्पणी भेजें
..मनापासुन ध्न्यवाद..