रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?

राज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.
पण.....
"महाराष्ट माझा" म्हणत "मराठीपणासाठी" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग "पाहिजे तेवढी" आणि "पाहिजे तशी" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची "वाजती घंटा" अहोरात्र वाजवत ठेवली. ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही "महाराष्टिय" पक्षांना शह देण्याची हि "तिरकस" चाल होती.
सेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते.
पण.......
काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात "मराठी" मते गोळा करून "कांग्रेशची चाल" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.
आता....
कांग्रेसच्या या "तिरकस" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी " वाकडी चाल" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.
आणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.
.
पवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने (? ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच. कॉग्रेसची परंपरांगत असलेली "दलित" आणि मुस्लिम मते तोडण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून "रिडालोस" ची स्थापना करवून घेण्यात आली.
आता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.
.
"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.


(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )

सचिन, नारायणगाव, पुणे.

9 प्रतिक्रया:

प. प्र. आचरेकर ने कहा…

Tuza Mudda barobar ahe, Parantu
Raj Thakare Yanaa baher ghalvanyas kon karnibhut ahe....swtah Udhav thakarech naa! Bare Sanjay Nirupam yanna mothe koni kele? Shivsenach naa! Meel che sampa koni kele? Shivsenach naa! Bare swatah Shivsena hich jar Kongress chi pillu, Rashtravadi dekhil koni vegali nahi ani Mag MNS asali tar kai vegale ahe! RPI che athavale dekhil yanchyatalech naa! Mazya mate desh sukhrup Congress chyach hatat rahil. Hyanchya yaa Shivsenechya Hatat sadhi mahanagarpalika ahe tar kiti Bhrashtachar, Shivaseneche head office corporate office zale asatana kay vegale bolawe hyala, mi suddha ek shivasainikach hoto pan atta.... Nahi, Me ahe Marathi Manus Ahe... Tula kai vatate apan tarun mhanun hi vicharanchi devanghevan fakta....
email me:saheb.pareshh@gmail.com
My Webpage: pareshacharekar.co.cc

बेनामी ने कहा…

काहीच नविन नाही.
जशी मुस्लिम अतिरेकी ही अमेरिकेची आणि शिवसेना कॉंग्रेसची तसंच आहे हे...

धमाल आहे या निवडणूकीत!!!

बेनामी ने कहा…

तुझ म्हणन बरोबर आहे. पण माझ मत अस आहे की सत्तेवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून दुसरा कोणताही पक्ष आला तर छान होईल. निदान साडेसाती तरी जाईल महाराष्ट्राची.

बेनामी ने कहा…

Good post. Intellectual..

प्रकाश बा. पिंपळे ने कहा…

bara pan tumhal he nahi watat ka ya weli barya paiki bhiti ahe pratekachya manat ani mag ya mule... astheryamule (rajakanyanchya manat) pudhil kahi wrasha bhiti poti barech chnagle nirrnay ghyawe lagatil karan sattet rahayche tar mag saglya vargache netrutwa karnaryanche mhnane aikave lagel. Mala watte jitke jast paryay uplabdha titki bhiti ani jitaki bhiti tiaki kame jast! [kdachit mi chuk hi asel pan ya weles hi theory nakki experimet keli jail he nakki!]

साळसूद पाचोळा ने कहा…

श्री..प्रकाश बा. पिंपळे.

नेपोलियन ने म्हतले होते " भीती हेच युद्धाचे कारन आहे" भीती पोटी प्रत्येक राजकिय नेता आपले सामर्थ वाढविण्याचा प्रयत्न करनार हे नक्कि.. मग ते सामर्थ तो राजकिय, सामाजिक कामे करून वाढवणार कि भष्टाचार karun आर्थिक सामर्थ वाढवनार हे त्या त्या नेत्यांच्या विचारधारेवर आधारित राहिल. कारन पैसावर निवडनुका सहज जिकता येतात हे काही नेत्यांचे मत आहेच.... ते फक्त पैसाच गोळा करनार

प्रकाश बा. पिंपळे ने कहा…

प्रिया सचिन,
पण बदल होतोय, जनतेला लॉंग टर्म फायदा कळायला लागला आहे. एका रात्रीची दारू, मिळाले ५०० या पेक्षा ५ वर्षाचे सुख नी कोरा सातबारा, कमी झालेली महागाई हे सगळ जातेला पातायाळ लागला आहे. नक्की सुराज्य येईल या १० वर्षात! पण तुम्ही म्हणता तसा नेत्यांची विचारसरणी बदलावी [किंवा असी विचारसरणी असणार्यांनी नेते व्हाव्हे]!
जय महाराष्ट्र!

साळसूद पाचोळा ने कहा…

प्रकाशजी...

बरोबर बोललात.
राजकारण फक्त निवडनुंकापुरते असावे, आपल्याकडे वर्षाचे ३६५ दिवस राजकारनच चालू असते...

प्रकाश बा. पिंपळे ने कहा…

ते हि खरे. ग्रामीण भागात कितेय्जानाचा घरच्या भाकरी खाऊन फक्त राजकारण करणे हा एक व्यवसाय असतो [घेणं नं देनं बरका यांना!] . शेतात तितकच गेले त काही त होईन! पण ह्या कार्यकर्त्याला फक्त कार्यकर्ता म्हणूनच राहाय्चेय. आमदार साहेब दोन शब्द गोड बोलले की उद्या सकाळी कार्यकर्ता हजर साहेबां सोबत फिरायला! का होत हे? स्वतःच्या हिताची जाणीवच नाही आम्हाला [स्वार्थाची म्हणत नाही]. या अश्या बापाच्या धंद्यापाई लेकरांची शिक्षण बुडतात, घराची अर्थी स्थिती डबघाई ला जाते. आणि मिळत काय तर अखेर निराशा आणि मग आमदार साहेबांनी सोडला की बसला पठ्या पारावर बिड्या फुकत आणि लेकरू शेतात (शाळा सोडून) आणि बायको खुरपायला. शिक्षणाने हे बदलू शकेल! आपण अंधारात आहोत याची जाणीव का एकदा झाली की मग मग अंधारातून बाहेर येण्याचा मार्ग मिळेल किंवा मग त्यसाठी प्रयत्न तरी होतील. आता या पैकी काहीच नाही. पण बदल होतोय मात्र मी मान्य करतो.
आपले विचार खूप आवडले! एक नजर या चर्चेवर हि टाकली तर बर्या पैकी समविचारी लोक इथे भेटतील: http://mukhyamantri.blogspot.com/2009/08/blog-post_25.html

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..