संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.
लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥
जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.
लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त "लाल" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.
परमात्मा, परब्रह्म "तेजाचा संचय" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या "तेजाला" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.
तेजाचा अनुभव म्हंजे "शुद्धतेचा अनुभव".
कबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.
अशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.
परमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत.
(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)
सचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९
3 प्रतिक्रया:
HE HASNARUA PRATEK PANAANO, RADNYALAA USHIR NAHI,
SURYE AAJUN TALLPNAAR AAHE, TUMHALAA PAN PACHOLLA BANVANAAR AAHE.
HE LINE MY LATE BROTHER DEO NANDED YANCHYA AATHWANITIL KAVITAA--- PCHOLLYACHA SANDESH.
सचिनः तुझ्या प्रतिक्रियेवरुन इथे, मला उद्धवजींचा इमेल आय डी मिळेन का ? कारण मी पाठविलेल्या इमेल आयडी वरुन मला ३ दिवसानंतर मेल न पोहोचलेल्याचा पोस्ट्मास्टर चा मेल आहे आहे. मी uddhav@shivsena.org या मेल आय डी वर ते मेल पाठविले होतं. या कामी आपली काही मदत झाली तर मी आपला आभारी राहीन. मला माझा मेल उद्धवजीं कडे काहीही करुन पोहोचावयचं आहे
-अजय
सुन्दर !!!
एक टिप्पणी भेजें
..मनापासुन ध्न्यवाद..