"ना रा य ण गां व"

"ना रा य ण गां व" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा "नाऱ्यांगाव" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे "नारांगाव".आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो..पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला "नारायणपुर" आणि "नाऱ्यांगाव" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. "निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची?.आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे..गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.
पुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण......... . वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या "शेवंता थिएटर्स" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. (मुंलिबद्दल आपल्या काय माहित नाहि बुवा) शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच!!!! . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र "मॅच्युअल डिपेंडंसी" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे..उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या. .ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात "मुंगळा-मुंगळा" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या "विठाबाई भाउ मांग" हिला "नारायणंगावकर" असं उपपद अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच...
.
.जगप्रसिद्ध ओली भेळ"नाऱ्यांगाव" वाचल्यावर मला एका "अनोळखि नाऱ्यांगाववाल्यानं" नाऱ्यांगावची जगप्रसिद्ध ओली भेळ आणि मिसळि बद्दल लिहा असं सुचवल ....
.

आता हे सुचवणारा नक्किच अस्सल खादाड आन खाद्य शोकिन असावा असा माझा पक्का समज झाला कारन नारायणगावची भेळ "जगप्रसिद्ध आहे" हे मला त्याच्या कडुनच कळालं, . . . आन भेळीचि टेस्ट आन गावचा अभिमान एकदम डब्बलच झालयासारखा वाटला.
.
नारांयणगावचा तमाशा, टेलिस्कोप, दारुची फॅक्टरी, विठाबाई भाऊ मांग, रा.प.सबणिस, द्राक्षे असल्या गोष्टि प्रसिद्ध आहेत एवढच बुवा आपल्याला (मण्जे मला) माहित होतं....
....ह्या प्रसिद्ध गोष्टिंपैकि दारुची फॅक्टरी म्हन्जे जाम वैतागवाडी, गावाला जातोय म्हटल्यावर आमच्या मित्रांनी दोन चार प्रसिद्ध बाटल्या (भरलेल्या) आणण्याची विनंति केलि म्हणुन समजाच. म्हणुन आजकाल पुण्या-मुंबईला राहणारे (शहाणे) नारायणगावकर ह्या प्रसिद्धगोष्टिचा (बेवड्यां मित्रमंडळीं मधे) उल्लेख मुद्दामच टाळतात, अस निदर्शनास आलं आहे.
.
आता ह्या भेळिबद्दल कुण्या खादाडंन वाचलं आन तुम्हाला ती आणण्याची विनंति केलिच तर मात्र माझ्या नावाने खडे न फोडता "त्या सुचवणाराच्या" नावाने फोडले तर बरे होईल...
.

कॉलेजच्या पोरी?.
.
त्या कॉलेजात काय (काय) करतात हे नेमकं माहित नाहि... पन एस.टि स्टँडमध्ये आल्यावर प्रत्येकजन (त्यातल्यात्यात पोरांचा ... ) अगदि ट्वाळ आन शहाणे(समजणारे) वीरही चोकशीच्या खिडकी कडे बेमालुमपणे टक्क लावुन असतात. काहि विर तर अर्जुनासारख़े एकाच वेळि अनेक नजरेचे बाण त्या खिडकिच्या देशेने सोडत असतात. ह्या साऱ्या "सुंदऱ्याचा मेळा" त्या "चोकशी खिडकिपाशीच" का भरतो? आन तो हि दररोज (रविवार सोडुन)?.
.
त्या खिडकिवाल्या कंडडाक्टरची आन पोरींची "तोंडओळख" नक्किच झालि असणार.... मग त्याच्याकडेच " हेमा आलि का हो, गुड्डि गेलि का हो? कुणाबरोबर गेलि? अशी चोकशी करायला काय हरकत आहे असं वारंवार वाटायचं .... नाहितरी "आळेफाटा गेलि का हो? खोडद किति वाजता आहे? अस्स काहि त्याला विचारलकि तो साला हमखास "ययील आता, वाट पहा थोडि" असली काहितरि छा छु उत्तर देतोच ना?.
.
मुंग्या जश्या तोंड जवळ आनुन (तोंडात तोंड खुपसुन) संदेश देवाण घेवाण करतात ना, हुबेहुब त्याप्रमाणं गठ्या-गठ्यानं यांचहि च्याव-म्याव चालु असतं... त्यातल्या ४-५ जणी मग एकदम " खि. खी.$ खी,..... बावळटच आहे मेला$ ...सगळे तस्सेच$.. येडपाटच्य. ... सँडल पाहिलि का?... असंल काहितरि बिच्चाऱ्या जवळुन जाणाऱ्या पोरांना त्यांच्या पाठिमागे (तोंडावरदेखिल) ऐकु येईल अश्या आवाजात खडसावतात.... मुद्दाम!
.
तश्या ईथल्या पोरी चवळिच्या शेंगेसारख्याच बऱ्यापैकी सडपातळ असतात हे माझं निरिक्षण, जितक्या अक्कडबाज तितक्याच लहरि ... मुलांकडं ढुंकुनही पाहत नाहीत (असा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करतात). . आन एखाद्यांवर फिदा झाल्यावर त्याच्यावरुन जीव ओवाळुन(एकदाच) टाकायलाही तयार...... दिसायलाही चिक्स, पन गावाकडचा स्पेशल लुकहि त्यात मिसळलेला... चिंगुपणातर यांच्या नसानसात भरलेला.... आपन बळेच बोलण्याचा प्रयत्न केला तरी "हा, हुं, नाय, नको" च्या पुढे बोलतिल तर शप्पथ!! .. फुक्कटच्या बोलण्यातहि चिंगुपना का करतात हे देवलाहि माहित नसावे कदाचित?

GMRT, Narayangaon

GMRT Khodad, located @ 19deg 5’ NORTH, & 74deg 2’ EAST. Its just 8Km from Narayangaon.
.
Giant Meter wave Radio Telescopes are used to collect the wave/radio signals that our universe produces due to graceful substance, stars, satellites, galaxies & so many other unidentified components which r lying in the space.

Total 30 Antennas/reflectors of ~45 m Diameter are positioned in shape of “Y” can revolve in angular direction. The Antenna is having fixed relation with another antenna of a space satellite revolving around Earth. Space satellite orbits @ the same speed that of earth and hence relation betwn both remains stationary with respect to the telescope antenna.
.
All r installed on cements frustruted conical shaped towers & welded structure, using advanced technology.
.
All 30 antennas r connected to each other & LAB using fiber optics cable. GMRT, TIFR (Tata Institute of Fundamental Research) & NCRA (National Centre for Radio Astrophysics) all three related institutes r connected same way.Different Frequency linearly polarized feeds like 50, 150, 210, 325, 610 & 1420 MHz has been utilized on these antennas along with frequency synthesizers.(normal frq for current is just 50Hz)....... Astronomical Observations of space objects can be done @ these freq. & we can get images upto 500:1, 1000:1 scale. Dat means 500 time enlargement & clarity can be possible.
.
GMRT Khodad captures raw data, converts & stores it, process data for detailing. All this is done by using software AIPS. . . AIPS the Astronomical Image Processing System software. Its main use is to standardize, calibrate and display radio astronomical data. Its like a TV Window & displays data or images @ various stages for editing/measuring.
.
There was a interference between GMRTs band frq & FM & Vividhbharati radio frequencies, which effected the projects outcome. I think this problems is resolved.
.
. due to rural area there is a lack of engineers & scientists.
.
As I remember this structure, band & polarization is designed & made by Bangalore based Raman Institute & research.सचिन, नारायणंगाव २१/६/०७

4 प्रतिक्रया:

HAREKRISHNAJI ने कहा…

मस्त लिहितात

rajendra ने कहा…

काय हुबेहूब वर्णन केले आहेस सचिन! मस्त !

नरेंद्र ने कहा…

छान लिहितोस , नरेंद्र from मंचर

नरेंद्र ने कहा…

छान लिहितोस , नरेंद्र from मंचर

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..