चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए,
दुई पाटन के बीच में शाबुत बचा ना कोए.
कबीर ह्या दोह्यातून निसर्गाचं एक विदारक पण वास्तववादी सत्य मांडताहेत. चक्की म्हंजे जाते, जे जुण्याकाळात धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं. त्याला दोन पाटे (पाटन किंवा चाके) असतात, एक जमिनीत स्थिर असते तर दुसरे त्यावर गरगर फिरत असते. चलती चक्की प्रमाणे हे जीवन गतिमान आहे, आणि त्यात शाश्वत असे काहीही नाही. सारं काही त्यात भरडले जाणार आहे, असाच साधा अर्थ आपणास कळतो.
पण.....,
कबीरा फिरणारं जातं पाहून रडताहेत कारण..... ..
त्यांना याद्वारे निसर्गातील एक अन्यायकारी सत्याची जाणीव झालीय. पृथ्वी आणि आकाश या निसर्गाच्या दोन चाकांमध्ये जे काही येईल मग सुख- दुःख, प्रेम-राग, न्याय-अन्याय, मान-अपमान सारं काही भरडून निघणार आहे. इथे दुर्जनाबरोबर आणि "दुर्जनांप्रमाणेच" सज्जनाचाही शेवट ठरलेला आहे. (सुक्या बरोबर ओलं ही जळते) दोघांनाही अंतिम न्याय एकच आहे. निसर्गाची गती शाबूत ठेवण्यासाठी हा "बदल" आवश्यकच आहे ह्या अगतिकतेमुळे कबीरांना वाईट वाटते आहे.
.
जीवनातील अश्वाश्वतता आणि गतिशीलता दाखविण्यासाठी सामान्य, साध्या जात्याचं उदाहरण देतात. बऱ्याच वेळा ते बहिणाबाईंसारखेही वाटतात.
.
(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)
सातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)
4 वर्ष पहले
5 प्रतिक्रया:
बरीच दडली आहे की पाचोळ्यात गुणांची पानगळ. साळसूदपणे इतके दिवस लिहित राहिलात. आज अनुक्षरे ला भेटलात.तेंव्हा शोधला मी आपल्या लिखाणांचा, चित्रांचा सुरेख असा ढिगारा, येत राहणार मी नेहमी उपसायला हा पाला पाचोळा, जपून त्यातून पुनः निवडणार, माझ्या आवडीचा पानांचा संग्रह. मस्तच आहे सर्व, नक्कीच निवांतपणे वाचीन. सदिश्च्या..
अनुक्षरेजी,
आमच्या साळसुद पाचोळेपनाचे आपन केलेल कोतुक पाहता, आम्ही अगदी हलके होवून वाऱ्याबरोबर उडू लागलो आहोत कि काय असा भास होतो आहे. मीपनाच्या वावटळीत सापडलो तर सैरभैर तर होनार नाही ना?
बाकी काहीही म्हना आपली हि ओझरती भेटही खुप हवेशीर वाटली, ताजगी मिळाली आम्च्या सुकलेल्या जीवाला. पाला-पाचोळ्याचा ढिगारा उपसुन "सुरेख" काहितरी शोधु पाहणाऱ्या आपलयाला "ह्या पाचोळ्यात" काही सापडले तरी आम्ही धन्य होवु.. ..
आपला..
साळसुद पाचोळा.
अरे वा! बरच काही दडलेलं आहे कि पाला पाचोळ्यामध्ये. कबीरांनी दैनंदिन जीवनावर सर्व सामान्यांना कळेल असच लिहिलेलं आहे. अगदी बहिणाबाई सारखं. सचिन तू खूप छान करतो आहेस. पाला पाचोळ्यात दडलेल्या त्या महान कवींच्या कविता ( दोहे) जगासमोर आणतो आहेस. आणि ते हि मराठीत. मला आनद झाला. :)
रविंद्र रवी...
मनापासून धन्यवाद.. आपली प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे... मी आपलया पोफाइलला भेट देण्याचा खुप प्रयत्न केला/करतो आहे, पन प्रोफाइल ओपन होत नाहिये.
... सालसूद पाचोळा.
सचिन. चुकून मी प्रोफाईल वर बदल केला होता. आता तू बघू शकतोस.
एक टिप्पणी भेजें
..मनापासुन ध्न्यवाद..